पुण्यामध्ये पूर आला तेव्हा भाजपचे सत्ताधारी पदाधिकारी झोपले होते का?


पुणे | पुण्यामध्ये सप्टेंबर 2019 मध्ये महापूर आला. ओढ्याकडेच्या संरक्षक भिंती पडून पुराचे पाणी शेकडो सोसायट्यांत शिरले. पावसाची चाहूल लागल्यावर अजूनही येथील रहिवाशांना धास्ती वाटते. आंबील ओढ्याच्या पुराचे पाणी सोसायट्यांमध्ये शिरले त्या काळात महापालिकेत आणि राज्यातही सत्तेवर असताना आपण काय केले हे आधी सांगा
प्रायमूव्ह इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या सल्लागार कंपनीची नियुक्ती केली, त्यांनी 281 कोटी रुपयांचा अहवाल दिला होता. त्याप्रमाणे स्थायी समितीने 77 कोटी रुपयांची निविदा प्रक्रियाही राबविली होती.
मात्र, ही कामे झालीच नाहीमात्र, महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने दोन वर्षे काहीही केले नाही आंबील ओढ्यालगतच्या संरक्षक भिंतीच्या कामासाठी राज्य शासनाकडे 300 कोटी रुपयांची मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पूर येऊन दोन वर्षे उलटली, त्या काळात महापालिकेत आणि राज्यातही भाजप सत्तेवर होते. तेव्हा भाजपचे सत्ताधारी पदाधिकारी झोपले होते का