KGF चॅप्टर 2 चा टीझर रिलीज..


मुंबई | सुपरस्टार यशच्या वाढदिवसानिमित्त या केजीएफ चॅप्टर2 चा टीझर अखेर रिलीज सिनेमाचा टीझर लाँच करण्यात येणार होता. मात्र दिलेल्या वेळेच्या एका दिवसाअगोदर हा टीझर लाँच करण्यात आलाय. होमबेल फिल्म्सकडून यूट्यूबवर हा टीझर रिलीज करण्यात आला आहे. रॉकीची आई आणि त्याचं बालपण यापासून टीझरची सुरुवात होताना दिसतेय. यामध्ये रवीना टंडन यामध्ये एका खासदाराच्या भूमिकेत असून संजय दत्त अधीराच्या लूकमध्ये दिसतोय.या टीझरची चाहते आतूरतेने वाट पाहत होते.