त्यामुळे मी गप्प होते…रेणू शर्मा

मुंबई | मुंडे मला व्हिडीओ कॉल करत माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायला सांगायचे आणि तेही करायचे, असा गंभीर आरोप रेणू शर्माने केला शर्माने मुंडेंवर खळबळजनक आरोप केलेत. आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची माझी इच्छा होती. मी अतिशय महत्त्वाकांक्षी होते. त्याचाच मुंडेंनी गैरवापर केला. मी तुझ्या मागे गंभीरपणे उभा राहीन, असं आश्वासन देऊन त्यांनी माझा फक्त वापर केला, असा गंभीर आरोप रेणू शर्माने केलाय. 2006 पासून चार-एक वर्ष सोडल्यास धनंजय मुंडेंनी माझा वापर केला. 2013 पासून त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली, असं रेणू शर्माने ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं. धनंजय मुंडेंकडे माझे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ होते. ते व्हिडीओ कॉलवरही शरीर संबंधांची मागणी करायचे आणि त्यानंतर शरीरसंबंध ठेवायचे. त्यामुळे मी गप्प होते, असं रेणू शर्माने सांगितलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने एबीपी माझाला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने सर्व प्रकरणाबाबत उलगडा करत आपली बाजू मांडली आहे. मुलाखतीत रेणूने अत्यंत धक्कादायक आणि सणसणाटी असे आरोप केले आहेत.धनंजय मुंडेनी माझा 2006 पासून माझा वापर केला आहे. माझ्यासोबत त्यांनी शारिरीक संबंध ठेवताना व्हिडीओ आणि फोटो घेतले आहेत. धनंजय मुंडे मला व्हिडीओ कॉल करत माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायला सांगायचे आणि तेही करायचे, असा गंभीर आरोप रेणू शर्माने केला आहे.धनंजय मुडेंनी मला तुझी लाईफ सेटल करून देतो मी तुझ्यामागे आहे. मी तुझ्यासोबत लग्न करतो, असं म्हणत त्यांनी माझा विश्वास संपादन केला आणि माझा फायदा घेतला असल्याचं रेणू शर्मा यांनी सांगितलं आहे. दरम्यान, 2006 पासून ते मधील वर्ष सोडल्यावनंतर पुन्हा 2013 पासून धनंजय मुंडेनी जबरदस्तीने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवलं

Latest News