…तुमच्यासारख्या महिला नेत्या घ्यायला लागल्या, तर महाराष्ट्रात महिला सबलीकरण होणं अशक्य

मुंबई | ठाकरे सरकारमधील महिला नेत्या खासदार सुप्रिया सुळे, मंत्री यशोमती ठाकूर आणि नीलम गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधला आहे. हाथरस प्रकरणात तिघीही खूपच आक्रमकपणे पीडित मुलीला न्याय मिळवण्यासाठी पुढे सरसावल्या होत्या. परंतु दुर्दैव असं आहे की आपल्या राज्यात  एखादी महिला मंत्रिमंडळातील मंत्र्याकडून तिच्यावर अत्याचार झाला हे सांगत असूनसुद्धा गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत, असं देसाई यांनी म्हटलं आहे. महिलांचं सबलीकरण यासाठी आवाज उठवत असताना आपल्या पक्षातील एखाद्या नेत्यावर आरोप झाले तर त्याविषयी बोलायं नाही अशी भूमिका जर तुमच्यासारख्या महिला नेत्या घ्यायला लागल्या तर महाराष्ट्रात महिला सबलीकरण होणं अशक्य असल्याचं तृप्ती देसाई म्हणाल्या. दरम्यान, आपण महाराष्ट्रात असाल तर नक्कीच या प्रकरणावर जाहीरपणे बोला, सध्या तुमची गरज रेणू शर्माला आहे, असं आवाहनही देसाई तिन्ही महिला नेत्यांना केलं आहे. महाविकास आघाडी सरकारचे धनंजय मुंडे मंत्री आहेत म्हणून “आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कारटे” अशी भूमिका याबाबतीत तुम्ही घेत आहात असं सर्वसामान्य जनतेला वाटत असल्याचं म्हणत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी

Latest News