धनंजय मुंडे बलात्काराच्या दोषी आढळले तर कारवाई करण्याची जबाबदारी आमची- शरद पवार


नवी दिल्ली | धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपांवर आपला मुळीच विश्वास नाही. या प्रकरणाची चौकशी होऊ द्या आणि जे काही सत्य असेल ते बाहेर येऊद्या. जर मुंडे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी आमची असल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून पवार सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी तेथील राष्ट्रवादीच्या कार्यालयाला शरद पवारांनी भेट दिली.सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपामुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र पवारांनी तूर्तास राजीनामा घेणार नसल्याचं सांगितल्यावर भाजप नेत्यांनी पवारांना लक्ष्य केलं. मात्र शरद पवारांनी यावर विरोधकांना उत्तर दिलं आहे. जणांचा बिनबुडाचे आणि निराधार आरोप करण्याचा व्यवसाय बनला आहे, असं म्हणत पवारांनी टीकाकारांना टोला लगावला आहे.