सीरम आग लागली आहे की लावलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे -प्रकाश आंबेडकर


मुंबई | सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली हे मला सोशल मीडियावरुन समजलं. ही आग लागली आहे की लावलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.दरम्यान, आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीसीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीबद्दल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शंका व्यक्त केली आहे.
आमदार मुक्ता टिळक :
पुण्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला भीषण आग लागली आहे.अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीमागे घातपाताची शंका आमदार मुक्ता टिळक यांनी व्यक्त केली आहे.दीडच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळतेय. सुदैवाने कोव्हिड लसीच्या इमारतीला आग लागलेली नाही. त्यामुळे लस सुरक्षित आहे. जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. मात्र हा घातपाताचा प्रकार