स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार – नाना पटोले

मुंबई |मला जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष बळकट करण्यासाठी आणि पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या नाना पटोलेंचं नाव चर्चेत असताना त्यांनी केलेल्या वक्तव्याने प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याच्या तयारीचे संकेत नानांनी दिले आहेत.दरम्यान, आमच्या पक्षात जे काही संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आहेत ते राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहेत. महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल, असंही नाना पटोले म्हणाा

Latest News