थोरातांमुळे दोन महिलांना मंत्री होण्याची संधी मिळाली- ठाकूर


मुंबई |काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात हेच राहायला हवेत कारण ते राहिले तर काँग्रेस पुढच्या वेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.थोरातांनी महिलांना नेतृत्व करण्याची संधी दिली. थोरातांमुळे दोन महिलांना मंत्री होण्याची संधी मिळाली. कोणी तयार नसताना थोरातांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली यशस्वीपणे पार पडली, असल्याचं यशोमती ठाकूर म्हणाल्या काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून धुसफूस चालू असल्याचं दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांची नाव चर्चेत आहेत. मात्र अशातच काँग्रेस नेत्या आणि महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी यासाठी मागणी केली आहे..