राज्यसरकार आदिवासी समाजाला अनुदान देत नाही :फडणवीस

पुणे ( प्रतिनिधी ) सरकारमधील तिन्ही पक्ष तीन वेगवेगळ्या दिशेने चालत असल्याने राज्याची अवस्था वाईट झाली आहे, असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला.ज्य सरकार आदिवासी समाजाला थेट पद्धतीने अनुदान देत नाही. राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांना केवळ खरेदीत रस आहे. कोणाला किती मलिदा मिळेल, यावरून सरकारमध्ये चाललेल्या भांडणात आदिवासी समाज योजनांपासून वंचित राहत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती / आदिवासी मोर्चाच्या वतीने भोसरी येथे अयोजित महाराष्ट्र प्रदेश कार्य समितीच्या मेळाव्यात फडणवीस बोलत होते
फडणवीस म्हणाले, ‘भाजप सरकारच्या काळात आदिवासी समाजासाठी मोठे काम करण्यात आले. समाजावरील १७५ कोटींचे खावटी कर्ज माफ करण्यात आले. पेसा अंतर्गत आदिवासी समाजाला थेट पद्धतीने अनुदान देण्यास सुरुवात केली. मात्र, आम्ही घेतलेले निर्णय या सरकारने रद्द केले. हा अधिकार त्यांना कोणी दिला? या सरकारला फक्त खरेदीत रस आहे. थेट अनुदान नाकारून आदिवासी समाजासाठी वस्तू खरेदीचा घाट सरकारने घातला आहे. कोणाला किती मलिदा मिळेल, याचे भांडण सुरू आहे.