शिष्यवृत्तीत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय..धनंजय मुंडे

dhananjay-munde_19308527

मुंबई: मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या लाभात काही भरीव बदल करण्यात आले असून, याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांना पूर्वी प्रतिमहिना ११० रुपये शिष्यवृत्ती मिळत असे ती वाढवून आता प्रतिमहिना २२५ रुपये करण्यात आली आहे. तिसरी ते दहावीतील विद्यार्थ्यांना महिना ११० रुपये मिळत होते. आता ही रक्कम वाढवून २२५ रुपये करण्यात आली आहे. तर वर्षाला मिळणारे एकत्रित मानधन हे पूर्वीप्रमाणे रुपये ७५० इतकेच असणार आहे. विद्यार्थ्यांना पूर्वी वर्षाला १८६० रुपये मिळत, नवीन नियमानुसार झालेल्या वाढीनंतर वर्षाला एकूण ३००० रुपये मिळणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

सफाई कामगारांच्या मुलांना दिल्या जाणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता दुप्पट शिष्यवृत्ती मिळणार आहे. वसतिगृहात राहणाऱ्या इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ७०० रुपये व वार्षिक अनुदान १००० रुपये या पूर्ववत नियमाप्रमाणेच सुरू राहील असेही या शासनानिर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील सफाईच्या क्षेत्रात व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या पाल्यांना या निर्णयामुळे दामदुप्पट लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही जात/धर्म याचे बंधन असणार नाही हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. 

Latest News