“महाराष्ट्राची सौंदर्यवती 2021” या स्पर्धेत पुणे येथील मानसी प्रभाकर हीने प्रथम क्रमांक पटकवला

पिंपरी-(प्रतिनिधी)
आचार्य अत्रे रंगमंदिर,पिंपरी येथे घेण्यात आलेल्या “महाराष्ट्राची सौंदर्यवती 2021” या स्पर्धेत पुणे येथील मानसी प्रभाकर हीने प्रथम क्रमांक पटकावला असून परळी (जिल्हा बीड ) येथील अदिती वाघमारे दुसरा क्रमांक तर वाई (जिल्हा सातारा) हिला तिसरा क्रमांक देण्यात आला आहे.
माझा आवाज व लॉलीपॉप एंटरटेनमेंट यांच्या वतीने महाराष्ट्रातील महिला व तरुणींसाठी “महाराष्ट्राची सौंदर्यवती 2021 हा महिलांचे सौंदर्य व टॅलेंट यावर राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून 35 महिला व तरुणींनी सहभाग घेतला.
आचार्य अत्रे रंगमंदिर येथे दि 27 फेब्रुवारी दिवसभर व 28 फेब्रुवारी सांयकाळी 4 वाजेपर्यंत ग्रोमिंग(प्रशिक्षण)देण्यात आले,व सांयकाळी 4.30 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली.स्पर्धेच्या दोन राऊडमध्ये 35 स्पर्धकातून टॉप 11 काढण्यात आले. सांयकाळी 06.30 वाजता टॉप 11 मधून टॅलेंट राउंड घेण्यात आला व त्यामधून तीन क्रमांक काढण्यात आले.
स्पर्धेसाठी सविता कुंभार (मिसेस युनिव्हर्स हॉनेस्टी),पूजा रेड्डी(फॅशन मॉडेल),मधूशा झाळके(मिसेस इंडिया अर्थ फेमस) व पीयूषा काटकर(रन वे मॉडेल)यांनी परिक्षणाचे काम पाहिले.
स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकाविणारास एक लाख रुपये येवला पैठणी,सोन्याची नथ क्राऊन व सासे,दुसऱ्या क्रमांकास एकावन्न हजार रुपये,येवला पैठणी,सोन्याची नथ क्राऊन व सासे व तिसऱ्या क्रमांकास एकेविस हजार रुपये येवला पैठणी,सोन्याची नथ क्राऊन व सासे देण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभ सांयकाळी 7 वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे घेण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर माई ढोरे व प्रसिद्ध फॅशन मॉडेल संध्या पांडे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी ज्येष्ट संपादक नाना कांबळे गायत्री पैठणीचे संचालक श्री अमोल रोडे ऑक्सिहाय बेवरेजचे संचालक श्री विशाल लोहीटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध रेडिओ जॉकी आर जे बंड्या यांनी केले तर प्रस्तावित बापूसाहेब गोरे व आभार संजय जोगदंड यांनी मानले.