माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत,बापालाच जाऊन विचार: चित्रा वाघ


मुंबई : अमोल मिटकरी आता आला आहे. भावा माझ्या, तुला काय माहिती? तुला आमदारकी दिली आहे पक्षाने, नेटाने काम कर. चांगला आवाज आहे बोलत राहा. बाकी माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार, साहेबांना विचार, ते सांगतील. यावर बोलून फार महत्त्व देण्याची गरज नाही” असं चित्रा वाघ म्हणाल्या
.“वाघाची” डरकाळी व्याघ्रवाड्यात अधिक उठावदार दिसत होती, पण कळपात गेल्यावर व्याघ्र डरकाळीसुद्धा हवेत कशी विरून जाते, हेही आज प्रत्यक्ष अनुभवले. शेवटी सिंहाच्या तालमीतील वाघ उरले केवळ नावापुरते…” असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले होते.सिंहाच्या तालमीतील वाघ केवळ नावापुरते उरले आहेत, अशी टीका करणारे राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांना यांनी सडेतोड उत्तर दिलं. मिटकरी भावा, माझे आणि ‘माझ्या बापा’चे अर्थात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारयांचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार, असं वाघ यांनी सुनावलं
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सायबर गुन्हे विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांची भेट घेतली. फोटो मॉर्फिंग प्रकरणी वाघ यांनी बीकेसी पोलिस ठाण्यांत तक्रार दिली
…“राजकारणात काय कुठल्याही क्षेत्रात महिलांसाठी रेड कार्पेट नाही, कधीही नव्हतं. मला राजकारणात जे जे काही समजलं, ते मी शिकले आणि मी त्यानुसार काम करते. 20 वर्ष मी राष्ट्रवादीत काम केलं. पहिल्या दिवसापासून मी सदस्य होते. मंत्रिपद कधी डोक्यात नव्हतं. मी माझं काम करत राहते. माझ्या मागे राजकारणाचा इतिहास-भूगोल नाही, मी सर्वसाधारण घरातील आहे. आमच्या घरात कोणी साधं ग्रामपंचायत सदस्यही नाही. माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत काम करणार” असं चित्रा वाघ म्हणाल्या. नुकत्याच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेतही चित्रा वाघ यांनी शरद पवार यांच्याविषयी विश्वास व्यक्त केला होता. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तालमीत तयार झाले आहे, हे सांगायला मला जराही संकोच वाटत नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील संपूर्ण तपशील शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचला, तर ते संजय राठोडला पाठीशी घालणार नाहीत, हे मी विश्वासाने सांगते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतही मला हा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले होते.
“