कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अमलबजावणी करावी – नगरसेवक संदीप वाघेरे

 पिंपरी- कोविड – १९ विषाणूचा प्रादुर्भाव पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा चेहरा पुन्हा एकदा जनतेसमोर येऊ लागला आहे. कोरोंनामुळे आत्तापर्यंत शहरामध्ये जवळपास १ लाख कोरोंना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. तर २५०० पेक्षा जास्त नागरिकांना या विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोंना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शहरातील आरोग्य यंत्रणा मेहनत घेत असली तरी, कोरोंना रुग्ण संख्या कमी होताना दिसून येत नाही. मागील आठवड्याभरात शहरामध्ये दररोज ३०० पेक्षा जास्त रुग्णसंख्या आढळून आलेली आहे. झपाट्याने वाढत असलेल्या या रुग्णासंख्येमुळे शहरातील नागरिकामध्ये चिंतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासर्व गोष्टी नियंत्रणात आणण्यासाठी कोविड – १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अमलबजावणी करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी सक्षम अधिकार्‍याची निवड करणे गरजेचे आहे.