राज्याचा अर्थसंकल्प महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक:राणे


मुंबई | राज्याचा अर्थसंकल्प हा फक्त पुण्याभोवती केंद्रीत महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक अर्थसंकल्प आहे. राज्याच्या उत्पन्नात मोठी तुट आहे अद्यापही कोरोना संपलेला नाही. अजूनही उत्पन्न कमीच येणार असं वाटत असताना अर्थसंकल्पात दावा केला एवढे पैसे कोठून येणार आहेत?, दीड लाख कोटी उत्पन्न कमी असताना एवढ्या गोष्टींसाठी पैसे कुठून आणणार? सरकारने फक्त घोषणा केल्यात, एकही तरतूद केलेली नसल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे
. कोकणाच्या कोणत्या योजनेला पैसा दिला?, कोकणाला काहीच दिलं नाही. आमच्या इकडे चक्रीवादळाला एक रूपयाही आला नाही. टिव्हीवर सुरू असणाऱ्या जाहिराती बघा, या जाहिराती बघून लोक शिव्या घालत आहेत. त्यांनी तीन महिने दिलेत, पण मी तर म्हणतो की हे सरकार एकही दिवस राहू नये, असंही नारायण राणे म्हणाले.दरम्यान, कोरोनाबद्दल हे बोलत आहेत पण देशातील सर्वाधिक कोरोना हॅाटस्पॅाट हे महाराष्ट्रात आहेत.
देशातल्या 10 जिल्ह्यांमधील 8 जिल्हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात पुन्हा लॅाकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री बोलत आहेत. देशातील रूग्णांच्या तुलनेत 60 टक्के रुग्ण महाराष्ट्रात असल्याचं म्हणत नारायण राणेंनी निशाणा साधला.राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. ठाकरे सरकारने आपला दुसरा अर्थसंकल्प सादर केला आहे. मात्र या अर्थसंकल्पावरून भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.