महाराष्ट्राला स्मारकांची नाही तर रूग्णालयांंची गरज:खासदार जलील

औरंगाबाद |बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मंजुर झालेली 400 कोटींची रक्कम रूग्णालय उभारणीसाठी वापरावी आणि त्या रूग्णालयाला बाळासाहेबांंचं नाव देण्यात यावं, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे

. त्यासोबतच सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला स्मारकांची नाही तर रूग्णालयांंची गरज असल्याचं म्हटलं आहे.बाळासाहेबांच्या स्मारकासाठी 400 कोटी रूपये आणि खर्च करण्यापेक्षा प्रत्येकी 100 कोटी खर्चून राज्यात चार मोठी रूग्णालयं त्यांच्या नावानं सुरू करता येईल, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

तर त्या चारही रूग्णालयांना बाळासाहेबांचं नाव दिली तर आमची काही हरकत नसल्याचंही जलील म्हणाले.महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. त्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने 400 कोटींची रक्कम तरतूद करण्यात आली आहे.

मात्र सरकारने बाळासाहेबांच्या स्मारकाला मंजूर झालेल्या पैशावरून औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे. दरम्यान, बाळासाहेबांच्या स्मारकाचं काम एकूण दोन टप्प्यांत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणं, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामं केली जातील. या सर्व कामांसाठी पहिल्या टप्प्यात अंदाजे 250 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आहे.