पुणेकरांना कोरोनासंदर्भात नवे निर्बंध नाहीत- विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे :   आरोग्य विषयातील तज्ज्ञांनीही पुण्यातील 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण दिल्यास दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत होईल, असा सल्ला दिल्याचं राव यांनी सांगितलं.  पुण्यातील कोरोना स्थितीविषयी सकाळी पालकमंत्री अजित पवार, मनपा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत काऊन्सिल हॉल येथे बैठक झाली. संसर्ग सर्वाधिक वेगानं वाढत असल्यानं लसीकरणात पुण्याला प्राधान्य मिळावं, अशी मागणी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच प्रशासनानं पुणेकरांवर कुठलेही नवे निर्बंध न लादण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण वाढवण्यावर आणि आरोग्य व्यवस्था सुधारणेवर भर देण्याचा निर्णय घेतला.

काय आहे नवीन नियम?

  • पुण्यातील शाळा  – महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील. 
  • दहावी आणि बारावीच्या विद्यार्थांना यातून सूट
  • हॉटेल्स दहा वाजेपर्यंत सुरु राहतील. तर होम डिलीव्हरी 11 वाजेपर्यंत करता येईल. 
  • त्याचबरोबर एकुण आसनक्षमतेच्या पन्नास टक्केच लोकांना परवनगी
  • लग्न समारंभ , धार्मिक विधी, कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम , अंत्यविधीप्रसंगी आणि दशक्रियाविधीसाठी फक्त पन्नास लोकांना परवानगी 
  • नियम न पाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कारवाईपुण्यातील बागा फक्त सकाळी सुरू राहतील तर संध्याकाळी बंद
  • रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचार नियंत्रण
  • एमपीएससीचे कोचिंग क्लासेस आणि लायब्ररीच्या पन्नास टक्के क्षमतेनुसार विद्यार्थांना वापरता येणार
  • थिएटर, मॉल्स आणि दुकानं दहा वाजेपर्यंत सुरु राहतील.

गेल्या काही दिवसांपासून  संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कड़क निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे पुण्यात लॉकडाऊन लागू केला जाणार नाही. पण कडक निर्बंध घालण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच शाळा 21 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश घेण्यात आले आहेत. तसेच उद्यानं एकवेळ बंद राहणार आहे. त्याशिवाय हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंतच सुरू राहणार आहे, असे निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आले आहेत

पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त उपस्थितीत होते. या बैठकीदरम्यान पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनाचा आढावा घेतला गेला. या ठिकाणी किती कोरोना रुग्ण आहेत, मृत्यू किती आहे? याचा आढावा घेतला जाईल. सध्या पुण्यात 62 कंटेन्मेंट झोन आहेत. या झोनमध्ये कडक निर्बंध लावण्यात येणार आहे. पुणे पालिकेच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक पार पडली.विशेष म्हणजे या बैठकीपूर्वी भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्या दोघांमध्ये लॉकडाऊन, वाढता कोरोना या विषयांवर चर्चा केल्याचे बोललं जात आहे.

पुण्यात कोरोनाची स्थिती काय?

पुण्यात कोरोनाने पुन्हा एकदा वर डोके काढले आहे. तीन ते चार महिने थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर शहरांत कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यापासून हा आकडा दररोज वाढतो आहे अर्थात कोरोनाबाधितांचा वाढता आलेख पाहायला मिळत आहे. पुणे शहरात गुरुवारी नव्याने 1 हजार 504 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्याअगोदर बुधवारी पुण्यात 1 हजार 352 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर मंगळवारी 1 हजार 86 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. गेल्या वर्षभर कोरोनाने सगळ्यांनाच हैरान केलं आहे. त्यातही पुण्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रुादुर्भाव पाहायला मिळाला. अगदी महाराष्ट्रातले सर्वाधिक कोरोना रुग्ण पुण्यात मिळाले. याच पार्श्वभूमीवर पुण्यात अतिशय कडक निर्बंध लादले गेले. कित्येक व्यापाऱ्यांची दुकाने पाच ते सहा महिने बंद होती. आता कुठे व्यवसाय पुन्हा रुळावर येतो ना येतो तोच पुन्हा एकदा कोरोनाने उसळी घ्यायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावले तरी चालतील पण आता लॉकडाऊन नको