‘टेक पाठशाला नॅशनल कॉम्पिटिशन’मध्ये आलिशाबा बेंजामिन प्रथम

‘टेक पाठशाला नॅशनल कॉम्पिटिशन’मध्ये आलिशाबा बेंजामिन प्रथम

पुणे :अमिटी युनिव्हर्सिटी आयोजित ‘टेक पाठशाला नॅशनल कॉम्पिटिशन ‘मध्ये महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनची विद्यार्थिनी आलिशाबा बेंजामिन हिने प्रथम क्रमांक पटकाविला. झोया अनिस शेख हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून अध्यापनाचे १० मिनिटाचे सादरीकरण करण्याच्या या स्पर्धेत भारतातून एकूण २६६ विद्यार्थी सहभागी झाले. ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या १० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.शेहनाज शेख,नौशीन शेख,शब्बीर फुलारी यांनी अभिनंदन केले. —