भाजप सत्तेत असताना 21 जणांना क्लिनचीट दिली:-भाई जगताप

मुंबई | भाजप सत्तेत असताना 21 जणांना फडणवीसांनी भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लिनचीट दिली होती. राज्यातील पोलीसांची खाती ही स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली?, असा प्रश्न भाई जगताप यांनी फडणवीसांना विचारला आहे. फडणवीस सरकराच्या काळात अनेक प्रकरणं अशी आहेत जी फडणवीस सरकारने दाबून टाकली होती. उंदीर मारण्याचा घोटाळा आणि सिडकोटा घोटाळा हा त्यापैकीच एक आहे, अशी टीका जगताप यांनी केली आहे.एकाच दिवसात 5 जणांना क्लिनचीट देणारे हे फडणवीस आहेत. मला वाटतं त्यांच डोकं आता ठिकाण्यावर नाहीये. पोलीसांची खाती त्यांच्या बायकोच्या बँकेत वर्ग केली होती तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता का?, अशा प्रकारची आम्ही 25 प्रकरणे बाहेर आणली परंतू त्यांनी सर्वांना क्लिनचीट दिली होती.

महाविकास आघाडीचं सरकार राज्यात पाच वर्षाचा कार्यकाळ व्यवस्थित पूर्ण करेल, असा विश्वास देखील भाई जगताप यांनी व्यक्त केला आहे.एकीकडे भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना निशाण्यावर घेत एकएका मंत्र्यांची विकेट काढायला सुरवात केली आहे. तर दुसरीकडे सरकारमधील नेते सुद्धा भाजपला त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कारस्थानांची आठवण करून देत आरसा दाखवत आहेत. फडणवीसांनी गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यावरून मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे