सावित्रीबाई फुले विद्यापीठानं गुणवत्ता सुधार योजनेतील 8 कोटीं निधीला कात्री…

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं गुणवत्ता सुधार योजनेतील निधीला 8 कोटींची कात्री लावली आहे. आता फक्त 5 कोटी देण्यात येणार आहेत. त्या 5 कोटी रुपयांनी काय होणार आहे?, असा सवाल महाविद्यालयांकडून करण्यात येत आहे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये या निधी कपातीच्या निर्णयामुळे संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

विद्यापीठाच्या निधीवर केवळ तिथल्या विभागांचाच अधिकार नाही तर सगळ्यांचा अधिकार आहे, अशी टीका महाविद्यालयांकडून करण्यात आली आहे. तर अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी गुणवत्ता सुधार योजना सुरु केली होती. त्यामध्ये महाविद्यालयांना आणि विद्यापीठाच्या विभागांना,परिषदा, चर्चासत्र यासोबतच महाविद्यालयासाठी आवश्‍यक वस्तू घेण्यासाठी मदत केली जात होती., सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या 11 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. याबाबतची सविस्तर नियमावली विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने जाहिर केली आहे.

त्यानुसार रविवारी सुद्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठातर्फे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. तांत्रिक अडचणीमुळे खोळंबा झाल्यास विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने दिली आहे.कोरोनामुळे सगळी शिक्षण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. तरी सुद्धा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांची शिकवणी घेत आहेत. मात्र या ऑनलाईन शिक्षणसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची आवश्‍यकता असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं निधीत कपात केली आहे