जगताप गटाच्या नानी घुले यांची उपमहापाैर पदी बिनविरोध निवड


पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापाैरपदाची सूत्रे चिंचवड चे आमदार जगताप समर्थक हिराबाई उर्फ नानी घुले यांच्या हाती आली असून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पुणे विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी या सभेचे पिठासीन प्राधिकारी म्हणून काम पाहिले. नगरसचिव तथा प्रभारी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी सभेचे कामकाज पाहिले.राष्ट्रवादी काॅग्रेसने उपमहापाैर पदासाठी पंकज भालेकर यांचा अर्ज दाखल केले होता. परंतू, पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी भालेकर यांचा अर्ज माघारी घेतला. त्यामुळे उपमहापौर नानी उर्फ हिराबाई गोवर्धन घुले यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचे महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील, पिठासीन प्राधिकारी रुबल अग्रवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले