पुणे शहरात नवीन पाच पोलिस ठाणे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू: पोलीस आयुक्त अमितेश कुमार


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)-
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्विकारल्यानंतर शहराच्या तुलनेने पुणे पोलिसांची गरजा आणि अडचणी पाहून शासनाकडे पाठपुरावा करून पुण्याला आवश्यक मनुष्यबळ व पोलिस ठाण्यांच्या गरजा, याचे महत्व आधोरेखीत केले.
परिणामी ७ पोलिस ठाण्यांची सुरूवात देखील तत्काळ झाली. परंतु, पुढील काही वर्षांची गरज ओळखून आणखी पाच पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. त्यानूसार, नव्या पाच पोलिस ठाण्यांची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. त्याचा प्रस्ताव प्रस्ताव येत्या आठवड्यात शासनाला सादर केला जाणार आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली
नवीन पाच पोलिस ठाण्यांसोबतच नागरिकांच्या दृष्टीने तसेच कामकाजासाठी सूसित्रकरणासाठी महत्वाच्या असणाऱ्या ३० पोलिस चौक्यांही प्रस्तावित आहेत. त्यासंदंर्भाने देखील हालचाली सुरू असून, त्याचीही रूपरेषा ठरविण्यात आली आहे
. नवीन पोलिस ठाण्यांसोबतच या चौक्यांही कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे मदत ही वेळेत पोहचणार आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच प्रचंड लोकसंख्येच्या तुलनेत पोलिस दलातील मनुष्यबळ, तांत्रिक साधने आणि गरज ओळखून नुकतीच कार्यान्वित केलेली ७ नवी पोलिस ठाणी तसेच पुढील काही वर्षांचे नियोजित लोकसंख्या वाढ लक्षात घेता आणखी ५ ठाणी व ३० चौक्यांची आवश्यकता असल्याने हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
पोलिस ठाण्यांचे महत्व का?
- पोलिस यंत्रणेवर पडणारा ताण कमी होणार
- विद्यमान पोलिस ठाण्यांवरील ताण २५ ते ३० टक्यांनी कमी होणार
- नागरिकांना जलद मदत व कामकाज सुरळीत राहणार
- कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होणार
- गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी मदत
- वाहतूक, गर्दी व सार्वजनिक कार्यक्रमांचे व्यवस्थापन सुकर होणार
‘ही’ असणार नवीन ५ पोलिस ठाणे
- विमानतळ पोलिस ठाण्यातून ‘लोहगाव’ पोलिस ठाणे
- नांदेड सिटी पोलिस ठाण्यातून नऱ्हे पोलिस ठाणे
- फुरसुंगी पोलिस ठाण्यातून मांजरी पोलिस ठाणे
- येरवडा पोलिस ठाण्यातून लक्ष्मीनगर पोलिस ठाणे
- कोंढवा पोलिस ठाण्यातून उंड्री पोलिस ठाणे