अहमदनगर मध्ये मुरळीला रस्त्यात अडवून मुरळीवर सामूहिक बलात्कार


अहमदनगर |
जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घराकडे निघालेल्या वाघ्या-मुरळीला रस्त्यात अडवून मुरळीचे काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीये. नगरजवळच्या निबोंडी गावात शुक्रवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली.आरोपी माळी याला नगर शहरातून अटक करण्यात आली. तर दुसरा आरोपी पुण्याला पळून गेला होता. तेथून त्याला अटक करण्यात आली. आता तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे
महिलेवर बलात्कार केला. त्यांच्याकडील नऊ हजार रुपये काढून घेऊन आरोपी पळून गेले. तिन्ही आरोपी शेतात काम करणारे मजूर आहेत.महिलेने भिंगार कँप पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अक्षय कचरू माळी आणि आकाश पोटे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी नीलेश पोटे फरार आहे.
.