राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर: नवाब मलिक


मुंबई |लॉकडाऊन की कठोर निर्बंध लावायचे या अनुषंगाने चर्चा झाली. यामध्ये विकेंड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तूर्तास तरी संपूर्ण लॉकडाऊन लागणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.महाराष्ट्रातील लॉकडाऊनसंदर्भात महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. आजपासून राज्यात विकेंड लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भात माहिती दिली
… राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशभरात महाराष्ट्र हे कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेलं राज्य आहे. मुंबई-पुण्यासह महत्त्वाच्या शहरांमधील रोजची कोरोनाबाधितांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार ठोस पाऊल उचलण्याची शक्यता वर्तवली जात होतीआज यासंदर्भात मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संपूर्ण आहे.
राज्यात दर शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊनला सुरूवात होईल. तो थेट सोमवारी सकाळीच संपले. दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत लॉकडाऊन पाळला जाणार आहे. अत्यावश्यक सेवांना फक्त यामध्ये सूट देण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊनची अधिकृत नियमावली उद्या रात्री 8 वाजता जारी करण्यात येणार