भिडे गुरूजी सरसंघचालमोहन भागवतकांना गांडू म्हणाले का?


मुंबई | सरसंघचालक मोहन भागवत यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर भागवत यांनी टेस्ट करून घेतली. त्यात त्यांची टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. त्यानंतर संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याशी मोहन भागवत यांचा संदर्भ जोडण्यात येत आहे. ‘सो दाऊद एक राऊत’ हे संजय राऊत यांच फॅनपेज आहे. या पेजवर भिडे गुरूजी सरसंघचालकांना गांडू म्हणाले का?, असा खोचक सवाल उपस्थित करण्यात आला आहे.कोरोना हा मुळ रोगच नाही आणि कोरोनामुळे मरणारे लोक हे जगण्याच्या लायकीचे नाहीत, संभाजी भिडे यांनी कोरोना संदर्भात अजब वक्तव्य केलं होतं.
त्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संभाजी भिडे यांची खिल्ली उडवली होती. तर नागरिकांना भडकवल्या प्रकरणी भिडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देखील करण्यात आली होती.लॉकडाऊन विरोधात लोकांनी बंड करायला पाहिजे आणि असे नियम लादणाऱ्या शासनाला फेकून द्यायला पाहिजे. कोरोना हा रोगच नाहिये हा गांडू वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, असं अजब आणि वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं. यावरून आता संजय राऊत यांच फॅनपेज असलेल्या एका पेजवरून संभाजी भिडे यांच्यावर टीका करत मोहन भागवतांना टोला लगावण्यात आला आहे.