पुण्यासाठी केंद्र सरकारकडून 2 लाख 48 हजार लसीचे डोस, मोदीचे महापौरा कडून आभार


मुंबई | पुण्यासाठी केंद्र सरकारकडून आज 2 लाख 48 हजार लसीचे डोस मिळाले आहेत. तर 1 लाख 25 हजार डोस शनिवारी उपलब्ध होणार आहेत. म्हणजे दोन दिवसांत पुण्यासाठी जवळपास पावणे चार लाख लसीचे डोस मिळणार आहेत. कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर तातडीनं लस पुरवठा केल्याबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असतानाही या कोव्हिड सेंटरमध्ये 300 ते 400 रुग्ण होते. मात्र, आता हे कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास रुग्णांवर उपचार कसे करायचे, हा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.राज्यात कोरोना लसीचा मोठा तुटवडा भासतोय. अनेक लसीकरण केंद्रांवर लसीचा साठा संपल्यामुळे लस टोचण्यासाठी आलेल्या नागरिकांना माघारी परतावं लागलं.
यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोध पक्षांमध्ये जुंपली आहे. अशात केंद्र सरकारने पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे.कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील आरोग्ययंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आहे. या संकटात आता आणखीनच भर पडली आहे. कारण जम्बो कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरल्याची माहिती समोर आली आहे.