आम्ही सोमवारी दुकाने उघणार :दौड व्यापारी


दौंड :महाराष्ट्रातील व्यापार्यांची शिखर संस्था असलेल्या फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फॅम) यांच्या सूचनेनुसार दौंड शहर व परिसरातील दुकाने राज्य शासनाच्या आदेशानुसार १० व ११ एप्रिल रोजी पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहेत. परंतु सोमवार (ता. १२) पासून सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दुकाने सुरू करण्यचा निर्णय घेण्यात आला आहे. दुकाने उघडल्यावर शासनाने निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली तरी त्या कारवाईस व्यापारी सामोरे जातील, अशी माहिती दौंड मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी दिली.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी आणि दुकानदारांनी शासनाने निश्चित केलेल्या नियमांचे पालन करावे. स्वतः बरोबर कर्मचारी आणि ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन असोसिएशनने केले आहे. दरम्यान ८ एप्रिल रोजी दौंड मधील व्यापारी संघटनांनी शासनाने लागू केलेल्या मिनी लॉकडाउनच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून प्रमुख चौकांमधून मोर्चा काढला होता.शासनाच्या निर्बंधांमुळे त्रस्त झालेल्या दौंड मधील व्यापार्यांनी सोमवारी (ता. १२) दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. दुकाने उघडल्यानंतर शासनाने निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली तरी त्या कारवाईस व्यापारी सामोरे जाण्याची तयारी दौंड मर्चंट असोसिएशन आणि दौंड व्यापारी महासंघाने केली आहे. दौंड शहरात मर्चंट असोसिएशन आणि व्यापारी महासंघाच्या मोजक्या व्यापारी प्रतिनिधींच्या ९ एप्रिल रोजी पार पडलेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शासनाने ` ब्रेक द चेन` च्या नावाखाली लागू केलेल्या लॉकडाउन मुळे बाजारपेठा बंद ठेवल्याने अर्थचक्र विस्कळित झाले आहे