मुंबई ( प्रतिनिधी ) सर्व परिस्थितीला तोंड देतोय. त्यामुळे पंतप्रधानांना ऑक्सिजन देण्याची विनंती केली. त्यांच्या क्षमतेप्रमाणे ऑक्सिजन पुरवठा सुरु झाला आहे. अधिकचा ऑक्सिजन इतर राज्यातून देण्यासाठी परवानगी मागितली आहे. ईशान्येकडील राज्यातून परवानगी दिलीय, ती हजारो किमीवर आहेत: ऑक्सिजन संपतोय, मागणी वाढतेयया कठीण काळात सर्वांशी चर्चा करतोय, पण निष्पण्ण काहीच नाही. एकही रुग्णसंख्या लपवत नाही, केंद्राकडे ऑक्सिजनची मागणीऔषधे जिथून मिळतील तिथून घेतोय. केंद्राकडे विनंती केलीय. पंतप्रधानांनाही विनंती केली. रोजच्या रोज त्यांच्याकडे अहवाल जातोय. एकही मृत्यू किंवा रुग्ण लपवत नाहीत.सध्याचा जो काळ आहे, ही परिस्थिती हातातून गेली तर नंतर काहीच होणार नाही. सध्या १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होते. सध्या हा आरोग्यासाठीच वापरला जातो. आज 950 मेट्रिक टन ऑक्सिजन वापरला जातोय. हा अपुरा पडतोय. रेमडेसीव्हिरची प्रचंड मागणी आहे.