उद्या संध्याकाळपासून ब्रेक द चेनसाठी राज्यात १४४ कलम लागू – पुढचे किमान १५ दिवस राज्यात संचारबंदीअनावश्यक येणे जाणे पूर्ण बंद.कोणत्याही व्यक्तीला अतिआवश्यक काम नसेल तर बाहेर पडू देऊ नयेउद्या 14 एप्रिलपासून निर्बंध लागू होतीलनिर्बंध घालतोय, पण पर्याय नाही. कडक पावलं उचलतोय. लॉकडाऊन म्हणत नाही, पण काही निर्बंध तसेच आहेत. साखळी तुटायला हवी. रोजीरोटी महत्त्वाची आहेच. रोजीरोटीसोबत जीव वाचवायला हवेत. तोच महत्त्वाचा मुद्दा आहे. हात जोडून विनंती करतो, आजपर्यंत जे निर्बंध टाकले ते वाढवतोय. उद्या 14 एप्रिलपासून रात्री ८ पासून निर्बंध लागू होती, पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक होतेय तिथे सूट असेल, मतदानानंतर तिथेही लागू होतीलउणीदुणी काढण्याची वेळ नाहीही उणीदुणी काढण्याची वेळ नाही. महाराष्ट्र आपलेला माफ करणार नाही. पंतप्रधानांना विनंती केली, देशातील सर्व नेत्यांना सांगा राजकारण बाजूला ठेवा. हे संकट मोठं आहे. ही जर साथ असेल तर आपण एकसाथ लढली पाहिजे. नाईलाजानेराज्यातील ७ कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा सरकारचा विचार, ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत देण्याचा विचार, लॅाकडाऊन काळात सरकार निर्णय घेण्याची शक्यता