महाराष्ट्रात ब्रेक-द- चेन उद्यापासून लागू..मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा: 5400 कोटीचे पॅकेज जाहीर…

मुंबई ( प्रतिनिधी ) सरकार म्हणून अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना एक महिन्यासाठी प्रत्येकी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देणार आहोत. या योजनेमध्ये सात कोटी नागरिकांचा समावेश आहे. दहा रुपयांची शिवभोजन थाळी पाच रुपयांवर आणली होती. पुढचे काही दिवस शिवभोजन थाळी मोफत देणार आहोत.कोव्हिडसाठी 3300 कोटी तात्काळ निधी म्हणून उपलब्ध. सुविधा वाढवणे, व्हेटिंलेटर्स किंवा तत्सम ५४०० कोटी रुपयांची मदत जाहीर, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा केली..

.जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी देणार. पटकन रुग्ण आला तर विचारत बसायचं नाही, निर्णय घ्या आणि उपाय करा संजय गांधी निराधार, श्रावळ बाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्ती योजना अशा पेन्शन लाभार्थ्यांना १ हजार रुपये आगाऊ देणार आहोत. यामध्ये ३५ लाख लोकांचा समावेश आहे…महाराष्ट्र राज्य इमारत कामगार कल्याण मंडळ आहे. त्यात १२ लाख लाभार्थी आहेत. त्यांना १५०० रुपये देणार आहोत.नोंदणीकृत घरेलू कामगार यांना निधी देणार आहोत.अधिकृत फेरीवाले यांना एका वेळेचे १५०० रुपये देत आहोत. यांची संख्या ५ लाख आहे.रिक्षा चालकांना १५०० रुपये देत आहोत. यांची संख्या १२ लाख आहे.आदिवासी कुटुंबाना प्रति कुटंब २००० रुपये देत आहोत. त्यांची संख्या १२ लाख आहे.कोविड संदर्भातील उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त निधी ३३०० कोटी कोविडसाठी बाजूला काढून ठेवत आहोत.हे सगळ करण्यासाठी पाच हजार चारशे कोटी रुपये निधी बाजुला काढून ठेवत आहे.

कोणत्याही व्यक्तीला अतिआवश्यक काम नसेल तर बाहेर पडू देऊ नका.आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच सुरु राहतील.सार्वजनिक वाहतूक सुरु राहील, ती केवळ जीवनावश्यक सेवा देणाऱ्यांसाठीच असेलऔषधे, लस उत्पादक, अत्यावश्यक सेवा देणारे, मास्क वितरक, वैद्यकीय लोक, जनावरेंशी संबंधित दवाखाने उघडी राहतील पत्रकारांनाही सूट असेल.उद्या संध्याकाळपासून ब्रेक द चेनसाठी राज्यात १४४ कलम लागू – पुढचे किमान १५ दिवस राज्यात संचारबंदी अनावश्यक येणे जाणे पूर्ण बंद. पेट्रोल पंप सुरु राहतीलहे वगळता बंद राहील. बांधकामं जिथे सुरु आहेत, तिथेच कर्मचाऱ्यांची राहण्याची सुविधा करा. त्यांना वाहतूक करु देऊ नका. थोडी वाहतूक सुरु ठेवत असाल तर बांधकाम उद्योग चालू ठेवू शकता.हॉटेल रेस्टॉरंटवर पूर्वीप्रमाणे निर्बंध, होम डिलिव्हरी सुरुरस्त्यावरील खाद्यपदार्थां सकाळी 7 ते राभी ८ पर्यंत सुरु राहील. गर्दी करु नये