मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 10 महत्त्वाचे मुद्दे

राज्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती चिंताजनक असल्याने राज्यात उद्या रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा फेसबुक लाईव्हद्वारे केली आहे. या पंधरा दिवसांत साखळी तोडण्यासाठी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. सोबतचं या काळात सर्वसामान्य गटातील नागरिकांसाठी मदत जाहीर केली आहे. या लॉकडाऊन 

1. 100 टक्के ऑक्सिजनचा उपयोग वैद्यकीय कारणांसाठी होणार. सध्या महाराष्ट्रात 950-1000 टन ऑक्सिजनचं उत्पन्न होतं.

2. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील इतर राज्यांमधूनही ऑक्सिजन आणण्याची परवानगी दिली. रस्त्याने ऑक्सिजन आणताना लष्कराच्या, वायू दलाच्या मदतीने हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्यासाठी परवानगी द्यावी आणि व्यवस्था करावी अशी मागणी पंतप्रधानांकडे करणार आहे.

3. मार्चमध्ये जीएसटीची मर्यादा असते ती आणखी 3 महिन्यांनी वाढवण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार. उद्योगधंदे राहिले पाहिजे, तरच रोजीरोटी राहिल.

4. या काळात रोजीरोटी गेली त्यांना व्यक्तिगत मदत करण्यासाठी पंतप्रधान मोदींकडे मागणी करणार.

5. रेमडेसिव्हिर इंजेक्शन कमी पडू देणार नाही.

6. रुग्णवाढ भयावह आहे. ऑक्सिजनचा खूप उपयोग करावा लागतोय कारण रुग्ण वाढलेत. त्यामुळे ऑक्सिजन तुटवडा होतोय.

7. नव्याने उत्तीर्ण होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना उपचाराच्या कामात सहभागी होण्याचं आवाहन. निवृत्त डॉक्टरांनीही या लढाईत सहभागी व्हावं.

8. एकदम लॉकडाऊन लावणार नाही, पण त्यासारखे काही निर्बंध लावावे लागतील. बुधवारी (14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार. याला केवळ पंढरपूर-मंगळवेढा काही दिवसांसाठी अपवाद असेल.

9. 14 एप्रिल सायंकाळपासून राज्यभरात ब्रेक द चेन अंतर्गत कलम 144 लागू करत संचारबंदी होणार. अनावश्यक प्रवास बंद करावा लागणार. योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

10. सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत अत्यावश्यक सेवा चालू असतील. लोकल आणि बससेवा बंद करणार नाही. जीवनावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी व्यवस्था ठेवणार.