BEST कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं’, शिवसेनेचे भाजपावर टीकास्त्र

बेस्ट कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं आणि त्यांनीच कामगारांना शिवसेनेच्या नावाने शिमगा करण्यास सांगितले असा घणाघाती आरोप शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून केला आहे.

मुंबई – बेस्ट कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांनंतर संप मागे घेतला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मध्यस्थाची नेमणूक केल्यानंतर बेस्ट कामगारांचे नेते शशांक राव यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली. बेस्ट कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं आणि त्यांनीच कामगारांना शिवसेनेच्या नावाने शिमगा करण्यास सांगितले अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’मधून भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

‘बेस्ट’सारखे उपक्रम आधी फायद्यात होते त्यास बरीच कारणे आहेत. फक्त रेल्वे आणि बेस्ट हीच दोन साधने प्रवासासाठी उपलब्ध होती. आज घरटी दोन गाड्या आहेत. ओला, उबेर, मेट्रो, मोनोरेलने नवे मार्ग निर्माण केले. त्याचाही फटका ‘बेस्ट’ला बसलाच आहे. या तोट्यात चाललेल्या उद्योगाचे खासगीकरण करून विषय संपवायचा की आहे ते टिकवून मराठी लोकांच्या नोकऱ्या वाचवायच्या याचे उत्तर फुकटची ‘राव’गिरी करणाऱ्यांनी व त्या रावांचे पडद्यामागून सूत्रसंचालन करणाऱ्यांनी द्यावे. जनता रंक आणि खाक झाली तरी चालेल, पण नेत्यांची ‘राव’गिरी चालत राहिली पाहिजे. आम्ही या विचारांचे नव्हंत. ज्यांना बोंबलायचे, त्यांनी खुशाल बोंबलावे असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

Latest News