पंढरपुरात भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर

सोलापूर | राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी निकाल लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.राष्ट्रवादीचे नेते व दिवंगत आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील जागा रिक्त झाली आणि त्यानंतर पंढरपुरात पोटनिवडणुकीचं वारं वाहू लागलं. यातच उमेदवारी कोणाला मिळणार यावरून चांगलंच रण पेटलं होतं. त्यात राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी दुहेरी आणि चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यातच आज या मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. कारण आज विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार आहे.

निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये, असं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे. तसेच कोरोना पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेशही लागू असल्याने नागरिकांना घराबाहेर पडून निकाल ऐकता येणार नाही. त्या ऐवजी घरात बसून आकाशवाणी किंवा वोटर हेल्पलाइन ॲपचा वापर करून निकाल जाणून घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये पंढरपूर येथे पोस्टल मतांची मोजणी सुरू झालेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना तसेच उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा जल्लोष करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या निकालानंतर नेमकी आमदारकीसाठी कोणाची वर्णी लागणआर