तृणमूल काँग्रेस आघाडीवर पण ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ असलेल्या नंदिग्राममध्ये पिछाडीवर

कोलकाता | निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून तृणमूल काँग्रेस सकाळी 11 वाजेपर्यंत जवळपास 191 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर भाजप 96 जागांवर आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूणच तृणमूल काँग्रेस आघाडीवर असलं तरी ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ असलेल्या नंदिग्राममध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत आहे.ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपचे शुभेंदू अधिकारी हे मैदानात उतरले आहेत. मतमोजणी दरम्यान चौथ्या फेरी अखेर ममता बॅनर्जी 7 हजार मतांनी पिछाडीवर असल्याचं दिसून आलं. शुभेंदूू अधिकारी हे नंदिग्राममध्ये सध्या आघाडीवर असून ममता बॅनर्जी या पिछाडीवर आहेतपश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस असा चुरशीचा सामना पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांनी कंबर कसून या निवडणुकीत प्रचारसभा घेत मोठ्या प्रमाणात दावे-प्रतिदावे केले..

नंदिग्राममध्ये 88 टक्के मतदान झालं असून या मतदारसंघातील मुस्लीम मतं निर्णयाक स्वरूपाची ठरणार आहेत. पूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये असणारे शुभेंदू अधिकारी हे आता तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्या विरोधात ‘काँटे की टक्कर’ देत असताना पाहायला मिळत आहेत.