पुण्यात लहान मुलांसाठी करोना रुग्णालय राखीव

पुणे : लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय. त्यामुळे पुण्यात लहान मुलांसाठी रुग्णालय राखीव करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर ज्यांना कोरोनाचा पहिला डोस दिला आहे, त्यांना दुसरा डोस देण्याला प्राधान्य आहे, लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय. आजच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. लहान मुलांना पुण्यातील राजीव गांधी रुग्णालय राखीव करतोय. सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असं अजित पवारांनी सांगितलं

पवार यांनी आज वाढत्या कोरोना संदर्भात पुण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं.अजित पवार म्हणाले, “लस बाहेर द्यायला नको होती. रशियाने त्यांचं झाल्यावर लस बाहेर दिली. आपल्याकडे अत्यंत चुकीचा निर्णय झाला.

भारतात तयार झालेल्या कोरोना लसी बाहेरच्या देशांना अगोदर द्यायला नको होत्या. रशियाने त्यांचं झाल्यावर लस दिली, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. इतकंच नाही तर सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनवाला यांना फोन लावला होता, ते अजून तरी दहा बारा दिवस इथं येणार नाहीत. त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं अजित पवार म्हणाले.

बाहेर द्यायची अजिबात आवश्यकता नव्हती. नियोजन करायला हवं होतं. लसीचा पुरवठा नसल्यानं राज्याती तुटवडा आहे. आता पन्नास टक्के लस बाहेर देता येईल. देशामध्ये विविध राज्यांना पन्नास टक्के लस द्यायला पाहिजे. सीरमने लस उत्पादन कित्येक पटीने वाढविले. पुढच्या टप्प्यात लशीचा जास्त फायदा होईल” 18 ते 44 वयोगटातील लोकांना सरकार लस देणार होते. मात्र पुरवठा नसल्यानं लसीकरण करण्यास अडचण येतेय. अदर पुनवाला यांना फोन लावला होता. ते अजून तरी दहा बारा दिवस इथं येणार नाहीत. तिथे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, असं अजित पवारांनी सांगितलं.

पहिला डोस दिला त्यांना दुसरा डोस द्यायला पाहिजे. 40 दिवस उलटून गेले, मात्र लस न दिल्याने संभ्रम निर्माण झालाय. मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांशी बोलणार आहे. दुसरा डोस प्राधान्याने द्यायचा विचार आहे. परदेशातील लस खरेदी करायला केंद्राने परवानगी द्यावी, अशी मागणी अजित पवारांनी केली. लसीच्या दरांमध्ये तफावत नको. कोर्टाने त्याबाबत सांगितलं आहे.

.

पुण्यातील लॉकडाऊनबाबत मी तसा सूतोवाच केला आहे. अनेक नेत्यांचंदेखील मत आहे. पोलिसांशी आम्ही बोललो त्यांच्या अडचणी आहेत. सध्या हायकोर्टाने सूचना केल्या आहेत. पुण्याच्या लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. कारण नसताना फिरणाऱ्या लोकाची संख्या कमी झाली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

Latest News