करोनाचा मुर्त्यू न देणाऱ्या रूग्णाल्यावर गुन्हा दाखल करण्याचा अजित पवार यांचा आदेश

पिंपरीः ( प्रतिनिधी ).बिल न दिल्याने कोरोना मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देणाऱ्या तळेगांव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथील मायमर मेडिकल कॉलेजवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिला पुणे जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीत मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी ही बाब पवार यांच्या कानावर घालताच त्यांनी क्षणात कारवाईचा आदेश . बारणे यांच्यामुळे हा संतापजनक प्रकार नुकताच (ता.३) उजेडात आला होता.

खा बारणे यांनी कानउघाडणी केल्यानेच या मेडिकल कॉलेजने या रुग्णाचा मृतदेह त्याच्या मुलाच्या ताब्यात दिला.तोपर्यंत कॉलेजने तो कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला होता. बील न दिल्याने तीन दिवस मृतदेह न देणे आणि नातेवाईकांची पिळवणूक करणे हे अतिशय संतापजनक आणि चुकीचे असल्याने सांगत मायमर व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार बारणे यांनी पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत पवारांकडे करताच याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे त्यांनी दिले.

महसूल विभागाचे अधिकारी काल मृत लोके यांचा मुलगा सुधीरकडे गेले. त्यांनी स्वतःच जबाब लिहिला आणि विलगीकरणात असतानाही या मुलाची सही घेतली. विलगीकरणातील व्यक्तीला भेटणे हा गुन्हा आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरी जाऊन महसूल विभागाचे अधिकारी स्वतःच्या हाताने जबाब लिहितात, हे अतिशय चुकीचे आहे.गुन्हा करणाऱ्या संस्थेशी शासकीय अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे

तीन दिवस एखादा मृतदेह अंत्यविधी न करता ठेवता येतो का, असे त्यांनी बैठकीत विचारताच प्रशासनाने तो तसा ठेवता येत नसल्याचे स्पष्ट केले. काही कारणाने तो ठेवायचा असेल, तर ज्या दिवशी मृत्यू झाला आहे, त्याच दिवशी त्याची खबर दिली पाहिजे, असे प्रशासनाने सांगितले. त्यावर मायमर कॉलेजच्या कोरोना सेंटरमध्ये लोणावळ्याजवळील मळवलीतील गणेश लोके या रुग्णाचा १ मे रोजी मृत्यू झाला

. त्याच्या कुटूंबियांकडे बिल देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तीन दिवस मृतदेह कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवला होता मायमरच्या प्रमुख डॉ. सुचित्रा नांगरे या माझ्यासमोर मृताच्या मुलाशी अरेरावी करत होत्या.उद्धटपणे बोलत होत्या. त्या मुलाने महात्मा फुले आरोग्य योजनेसाठी अर्ज केला होता. त्याला 50 हजार रुपये मंजूर होणार होते.बिल,पण तेवढेच होते.असे असतानाही मृतदेह देण्यास नकार दिला होता, अशी सर्व हकीकत खासदार बारणे यांनी सांगितली.

Latest News