पुण्यात 25 लाखांच्या पुढे कोरोना चाचण्या


पुणे : ”चाचण्यांच्या संख्येत सातत्य ठेवल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. कोरोनाच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा पार पडला असून 1 जूनला कोरोना चाचण्यांची संख्या 25 लाखांच्या पुढे गेली आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी टिव्ट करुन दिल
पुणे शहरात आज एकाच दिवसात 7 हजार 483 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 25 लाख 10 हजार 184 इतकी झाली आहे.पुणे शहरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात नियंत्रणात आल्याचे चित्र दिसत होते. त्यानंतर 1 तारखेपासून निर्बंध काहीसे शिथिल करण्यात आले
दरम्यानपुणे शहरात आज नव्याने 467 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 70 हजार 778 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे जिल्ह्यात एकूण 1836 रुग्ण बाधित झाले असून
त्यापैकी शहरात – 467, पिंपरी चिंचवड – 372, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र – 803, नगरपालिका क्षेत्र – 170, कॅंटोन्मेंट बोर्ड -24 रुग्ण बाधित झाले आहेत. पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 3502 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील 651कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 57 हजार 160 झाली आहे.
पुणे कोरोना अपडेट : बुधवार ०२ जून,२०२१
- ◆ उपचार सुरु : ५,३०५
- ◆ नवे रुग्ण : ४६७ (४,७०,७७८)
- ◆ डिस्चार्ज : ६५१ (४,५७,१६०)
- ◆ चाचण्या : ७,४८३ (२५,१०,१८४)
- ◆ मृत्यू : २९ (८,३१३