रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड गावात टाळेबंदी


रायगड (प्रतिनिधी ) कोरोनाच्या गावातील परिस्थितीवरून ग्रामपंचायतीनं हा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता हॉटेल, लॉजिंग पूर्णपणे बंद राहणार आहे. विशेष म्हणजे 6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनी कोणी गावात येऊ नये, असं आवाहन ग्रामस्थांनी शिवभक्तांना केलं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात टाळेबंदी लावण्यात आली आहे.
त्यामुळे प्रशासन आणि शिवभक्त आता आमने सामने येण्याची शक्यता आहे.खासदार संभाजीराजे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा आता आणखी पेटत चालला आहे. संभाजीराजे यांनी ठाकरे सरकारसमोर पाच प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या, त्यासोबतच ठाकरे सरकारला 6 जून पर्यंत अल्टिमेटम त्यांनी दिला होता
. त्यानंतर ठाकरे सरकारची मोठी पंचायत झाली होती. मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका अद्याप सरकारनं घेतली नसल्यानं संभाजीराजे यांनी मोठं पाऊल उचललं होतं.दरम्यान, दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर जातात. मागील वर्षी कोरोनामुळे सोहळा रद्द करण्यात आला होता
. मात्र, आता कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्यानं शिवभक्तांना रायगडावर जाता येईल असं वाटत होतं. तर आता या प्रकरणी संभाजीराजे काय भूमिका घेतील याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे कूच करा, असा आदेश दिला होता.
मिळेल त्या वाहनानं रागडावर पोहचा असं संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. त्यामुळे 6 जून रोजी किल्ले रायगडावरून संभाजीराजे कोणती नवी घोषणा करणार, याची सर्वांना उत्सुकता लागली होती. मात्र, आता संभाजीराजे यांच्या नियोजित कार्यक्रमात अडथळा येण्याची शक्यता आहे.