इंधन दरवाढीवरुन केंद्राला जबाबदार ठरवणे चुकीचं-:चंद्रकांत पाटील


पुणे ::+इंधन दरवाढीवरुन राज्य सरकार केंद्राला जबाबदार धरत आहे हेअत्यंत चुकीचं आहे. त्याचसोबत राज्याने केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा आपला कर कमी करावा म्हणजे इंधनाचे दर कमी होतील असं मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल
. इंधन दरवाढ झाली म्हणून सरसकट केंद्राकडे बोट दाखवणं चुकीचं असल्याचंही ते म्हणाले. राज्यासह देशातही काही ठिकाणी इंधनाचे भाव गगनाला भिडलेले आहेत.राज्यासह देशातल्या अनेक भागात पेट्रोल-डिझेलचे भाव प्रचंड वाढले आहेत. देशातील सहा राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. पेट्रोलच्या दरांत लिटरला २१ पैशांची, तर डिझेलच्या दरांत लिटरमागे २० पैशांनी वाढ करण्यात आल्याचे सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे
. ४ मेपासून विसाव्यांदा करण्यात आलेल्या या दरवाढीमुळे देशभरातील इंधनाच्या दरांनी ऐतिहासिक विक्रम केला आहे.राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तेलंगण ही राज्ये आणि लडाखच्या केंद्रशासित प्रदेशांत पेट्रोल आता शंभरीपार पोहचले आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर आजवरचे सर्वाधिक, म्हणजे लिटरला ९५.०९ रुपये, तर डिझेलचे दर लिटरमागे ८६.०१ रुपये झाले आहेत.
पेट्रोल लिटरला १०० रुपयांहून अधिक दराने विकले जात असलेले मुंबई हे २९ मे रोजी देशातील पहिले महानगर ठरले होते. मुंबईत आता पेट्रोलसाठी लिटरला १०१.३ रुपये, तर डिझेलसाठी लिटरमागे ९३.३५ रुपये मोजावे लागत आहेत. तर पुण्यामध्ये शंभरी पार केलेल्या पेट्रोलच्या दरात अजून आज अजून वाढ झाली आहे. पुण्यात सध्या पेट्रोल १०१.१८ रुपये तर पॉवर पेट्रोल १०४.८७ रुपये लीटर झालं आहे
. तर डिझेलची प्रतिलीटर किंमत ९१.८२ रुपये झाली आहे.इंधनदरवाढीच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसने आज आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पेट्रोल दरवाढ रद्द करण्यासंदर्भातही जोरदार घोषणाबाजी बराच वेळ सुरु होती. अनेक काँग्रेस पदाधिकारी पेट्रोल पंपासमोर घोडागाडीमध्ये बसून घोषणा देत होते. एका बॅनरमध्ये तर मोदींचा चेहरा लावून महागाईचा भस्मासूर असं लिहिण्यात आलं होतं.