पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या नावाने फेसबुकवर बनावट पैसे मागितल्याचा प्रकार

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंटफेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करीत पैशांची गरज असल्याचे मॅसेज पाठवून अनेकांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये पिंपरी – चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावानेही असेच बनावट फेसबुक अकाऊंट बनवून यूजर्सकडे पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला होता
.पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून लोकांकडून पैसे मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेचे माहिती – तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण यांनी यांसदर्भात पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दिली आहे.
आता महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून लोकांकडून पैसे मागितले आहेत. याशिवाय या अकाऊंटवरून काही जणांना फ्रेंड रिक्वेस्टही पाठवली आहे. मात्र, त्यानंतर हे अकाऊंट बंद केले आहे.
”महापालिका आयुक्तांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्यानंतर हे अकाऊंट बंद करण्यात आले आहे. याबाबतची तक्रार प्राप्त झाली असून फेसबुककडून माहिती मागविण्यात येणार आहे.”
– सुधीर हिरेमठ, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड.