पिंपरी तील YCM रुग्णालयात ऑक्सिजनची गळती नाही:आयुक्त राजेश पाटील


पिंपरी :: वैद्यकीय वापरासाठीचा द्रवरुप ऑक्सीजन एका टाकीमध्ये भरला जात होता. त्यावेळी टाकीतील दाब कमीअधिक होत होता. त्यामुळे जादा दाब देण्यासाठी असलेले सुरक्षा वॉल्व्ह सुरु केले. मात्र, त्यात अचानक बिघाड झाला. यानंतर तात्काळ राखीव असलेल्या सुरक्षा वॉल्व्हचा वापर केला. त्यामुळे प्रत्यक्षात कोणतीही गळती झालेली नाही”पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बुधवारी ऑक्सिजनची गळती झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. मात्र, तो चुकीचा असल्याचा महापलिका आयुक्त राजेश पाटिल यांनी सांगितले
ऑक्सिजन टाकीत भरताना काही तांत्रिक बिघाडामुळं काही कोळ गोंधळ निर्माण झाला पण तात्काळ पर्यायी मार्गाचा वापर करण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्षात ऑक्सिजनची गळती झाली नाही, नसल्याचं स्पष्टीकरण महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी दिली
.दरम्यान, रुग्णालयात ३०० रूग्ण आहेत तसेच दीड तासांहून अधिक काळ चालेल इतका ऑक्सिजनचा बॅकअप आहे. ज्या टँकमधून हा ऑक्सिजन सोडला तो दोनपासून ३० खाटांपर्यंत असणाऱ्या अतिदक्षता विभागासाठी आणि सुमारे १०० रूग्ण ठेवलेल्या एका मजल्यासाठी जाणार होता. त्यामुळे सर्व रुग्ण आणि इतर ऑक्सिजनच्या टाक्या सुरक्षित आहेत, असंही यावेळी पाटील यांनी सांगितलं.