पिंपरीत केवायसी करून देतो म्हणून एका तरुणीची दीड लाखांची फसवणूक


.पुणे :::केवायसी अपडेट करून देतो असे म्हणून एका तरुणीची दीड लाखांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली. तरुणीला अज्ञात व्यक्तीने फोन करून केवायसी अपडेट करून देतो असे सांगितले, त्या तरुणीने सर्व बँक डिटेल्स दिल्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये तिच्या बँक खात्यातील रक्कम सायबर गुन्हेगारांनी लंपास केल्याचं तुंगार यांनी सांगितलं आहे .
गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांची संख्या वाढली असून क्यूआर कोड स्कॅन करायला लावणे, अनोळखी लिंकवर क्लिक केल्यास आर्थिक फसवणूक होणे, अॅपद्वारे फसवणूक अशा दररोज दहा ते बारा तक्रारी येत आहेत .बँक फोन करून केवायसीबद्दल विचारत नाहीत. नागरिकांनी फोनवरुन अशी माहिती देऊ नये. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका असं आवाहन तुंगार यांनी केले
पिंपरी-चिंचवडमध्ये केवायसी अपडेट करून देतो असे म्हणून एका तरुणीला दीड लाखांचा गंडा घालण्यात आलाय. गेल्या काही महिन्यांपासून क्यूआर कोड, अनोळखी लिंक, ऍप डाऊनलोड करायला सांगून आर्थिक फसवणूक केली आहे .
ऑनलाईन मद्य मागविणे, अनोळखी व्यक्तीने क्यूआर कोड स्कॅन करायला लावणे, अनोळखी व्यक्तीने पाठवलेली लिंक क्लीक करणे, केवायसी अपडेट करायला सांगणे, दररोज अश्या प्रकारच्या दहा ते बारा तक्रारी येत आहेत. अज्ञात सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या कारणावरून फोन करू शकतो असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे.