पुण्यात बार्टी मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण

IMG-20210617-WA0039
जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांचे हस्ते वृक्षारोपण

बार्टी मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण
पुणे दि. 17. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,(बार्टी) पुणे यांच्या समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे त्या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय सर्वसाधारण शाखेचे तहसीलदार श्री श्रावण ताथे,बार्टी जिल्हा प्रकल्प अधिकारी श्रीमती शितल बंडगर, समतादूत प्रशांत कुलकर्णी, शशिकांत जाधव यांच्यासह अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डाॅ. देशमुख यांनी बार्टीच्या या उपक्रमाचे कौतुक केले तसेच वृक्षारोपण पंधरवडा अभियानास शुभेच्छा दिल्या.

Latest News