पिंपरी चिंचवड शहरात उद्यापासून 45 वर्षांवरील नागरिकांना लस देणार…

A healthcare worker looks on as a nurse prepares a dose of the AstraZeneca's COVISHIELD vaccine, during the coronavirus disease (COVID-19) vaccination campaign, at a medical centre in Mumbai, India, January 16, 2021. REUTERS/Francis Mascarenhas

पिंपरी -गुरुवारी लसीकरण सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत होणार आहे. तसेच 45 वर्षांवरील नागरिकांचा दुसरा डोस (पहिल्या डोस नंतर 28 दिवस झालेल्या लाभार्थ्यांना) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा या लसीकरण केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी पाच या कालावधीत देण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी (दि. 24) 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरूवात होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने 45 केंदांची व्यवस्था करण्यात आली असून सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसेच 45 वर्षांवरील नागरिकांनाही लस देण्यात येणार आहे. यासाठी केंद्रांवर सकाळी 9 वाजता टोकन वाटप सुरू होईल. दरम्यान नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. या केंद्रावर 100 लाभार्थी क्षमता आहे. याबरोबरच कोव्हॅक्सिन लसीचा वय 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थीना फक्त दुसरा डोस महापालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालय या लसीकरण केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत देण्यात येणार आहे. या केंद्रावर 100 लाभार्थी क्षमता आहे. तसेच कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या ज्या नागरिकांना दुसरा डोस (84 दिवसांनंतर 112 दिवसापर्यंत) घ्यायचा आहे. त्यांच्यासाठी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.