पुणे,म्हाडा च्या वतीने 2908 सदनिकांसाठी ऑनलाइन लॉटरी


पुणे :+पुण्यासह सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ‘म्हाडा’च्या २१५३ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ७५५ सदनिका अशा २९०८ सदनिकांचा यात समावेश आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने (म्हाडा) दोन हजार ९०८ सदनिकांसाठी लॉटरी पद्धतीने ऑनलाइन सोडत दोन जुलै रोजी काढण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात सोडत होणार आहे. नागरिकांना घरबसल्या सोडत पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सदनिकांसाठी यापूर्वी २९ मे रोजी सोडत काढली जाणार होती. ‘सदनिकांसाठी दोन जुलैला ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. नागरिकांना ‘म्हाडा’च्या https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर घरबसल्या निकाल पाहता येणार आहे.
विजेत्यांना ई-मेल आणि ‘एसएमएस’द्वारे माहिती पाठविण्यात येणार आहे,’ असे ‘म्हाडा’चे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले. दरम्यान, सदनिकांसाठी १४ मेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. मात्र, करोनामुळे एक महिना मुदतवाढ देण्यात आली.
.