पुण्यातील प्राध्यपकाने नैराश्येतून फेसबुकवर पोस्ट टाकत आत्महत्या

प्रफुल्ल मेश्राम हे कमिन्स महाविद्यालयात प्राध्यपक होते. त्यांनी मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याचे सुमारास फेसबुकवर ‘बाय बाय डिप्रेशन’, ‘सॉरी गुड्डी’ अशी पोस्ट टाकली. त्यानंतर त्यांचे मित्र त्यांच्याशी संर्पक साधत होते. परंतु संपर्क होऊ शकला नाही. यादरम्यान मेश्राम यांनी पुरंदर तालुक्यातील भिवरी गावात रस्त्याचे कडेला असणाऱ्या शेतातील विहरित उडी मारुन आत्महत्या केली. मेश्राम यांचा शोध घेत असतानाच त्यांचा मृतदेह शेतातील विहिरीत मिळून आला. सासवड पोलीसांना विहिरी जवळ मेश्राम यांची चप्पल, गाडीची चावी, पाकिट, मोबाईल , हेडफोन, रुमाल आढळून आला. पोलीसांनी विहिरीतून मेश्राम यांचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनास पाठवला. पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यपकाने नैराश्येतून फेसबुकवर पोस्ट टाकत सासवड येथील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रफुल्ल दादाजी मेश्राम (वय-४५,रा.कात्रज,पुणे) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यपकाचे नाव आहे. काही वर्षापूर्वी मेश्राम यांना अर्धांगवायूचा झटका आला होता व त्याची औषधे सुरु होती. त्यातच कौटुंबिक कारणातून निराशा आल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत सासवड पोलीस पुढील तपास करत आहे.

Latest News