भारती विद्यापीठ पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याला ठोकल्या बेड्या…


पुणे : कात्रज कोंढवा रस्त्यावर गोकुळनगर चौकातील स्वामी समर्थनगर चौकाजवळ आरोपी कोयते, पालघन, मिरची पावडर, तीन मोबाईल आणि एका दुचाकीसह दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसले होते. याची माहिती रात्रगस्तीवरील पोलिसांना मिळाली होती.दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले.
त्यांच्याकडून कोयते, मिरचीपूड, दोरी, मोबाईल, दुचाकी असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सनी महादेव डेंगळे (वय – 19), भुजंग महादेव डेंगळे (वय – 24, दोघेही रा. प्रतिकनगर, कात्रज), अजय बिरमल शिंद (वय – 22), विकास भिमराव माशाळे (वय – 20) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्यांपैकी आरोपी सनी डेंगळे सराईत गुन्हेगार आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी गणेश काळे यांनी फिर्याद दिली आहे
. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी सहायक निरीक्षक जी. जी. घावटे तपास करत आहेत.