स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांच्या सह 16 सदस्यही ACB च्या रडारवर…

स्थायी समितीचे 16 सदस्यही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चौकशीच्या रडारवर

लांडगे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या अंगझडतीमध्ये 48 हजार 560 रुपये मिळून आले. तर स्थायी समिती कार्यालयात 5 लाख 68 हजारांची रोकड आढळून आली. या टक्केवारीच्या बाजारात स्थायी समितीचे 16 सदस्यही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चौकशीच्या रडारवर आले आहेत.

त्यामुळे भाजप नगरसेवकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती कार्यालयातील लाच प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचे उघड झाले आहे. 1 लाख 18 हजारांची लाच घेतल्या प्रकरणी ऍण्टिकरप्शनच्या जाळ्यात अडकलेल्या स्थायी समिती सभापती ऍड. नितीन लांडगे यांच्या घराची झडती घेण्यात आली असून इतर मालमत्तांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने महापालिका स्थायी समिती कार्यालयावर बुधवारी (दि. 18) धाड टाकली. या लाच प्रकरणात स्थायी समिती सभापती ऍड. नितीन लांडगे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे, शिपाई अरविंद कांबळे, संगणकचालक राजेंद्र शिंदे आणि कारकून विजय चावरिया यांना अटक करण्यात आली. अटक आरोपींना गुरुवारी (दि. 19) पुण्यात विशेष न्यायाधीश एस.बी. हेडाऊ यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी सर्व आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून पाचही आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Latest News