स्व. राजीव गांधी प्रतिष्ठानच्या वतिने जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा सन्मान

खडकी : स्व. राजीव गांधी प्रतिष्ठानच्या वतिने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पर्यावरण समितीचे महासचिव अशोक काळभोर यांच्या हस्ते मान्यवरांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
राजीव गांधी यांनी आधुनिक युग सुरू केले, कम्प्युटर भारतामध्ये आणून भारताची क्रांती घडविण्यामध्ये राजीव गांधी यांचा मोठा हात आहे असे अध्यक्ष काळभोर यांनी मत व्यक्त केले.
राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश नवले हस्ते पत्रकार अमोल सहारे (पुढारी), महादेव माशाळ (लोकमत), संतोष महामुनी (लोकमत), उमेश पाटिल, चंद्रकांत सोनवणे, डाँ. अनिकेत ताठे, आनंद कांबळे, पतिक्षा लांडगे, विवेक मंडल, कल्याणी सोमवंशी यांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी जागृती मनाकांत, अस्मिता कांबळे, विजेंद्र गायकवाड, प्रतिक नवले, रोहित शेळके, सौरभ शिंदे, शिरीष देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबा खराडे तर सचिन शिंगोटे यांनी आभार व्यक्त केले.

Latest News