NCP आमदार अमोल मिटकरी यांची राज ठाकरेंवर नाव न घेता टीका

पुणे : राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचं महापातक करून ‘राष्ट्रद्रोह’ केला ती व्यक्ती!अपयशी नेत्याला उत्तर देणं म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणं आहे, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

जातीयवादाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे विधान परिषदचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला आहे. जातीयवादाची सुरूवात राष्ट्रवादीच्या जन्मानंतर झाल्याचं राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यानंतर राज ठाकरेंनी यावर बोलताना राज यांना त्यांच्या आजोबांची पुस्तके वाचायला सांगितली होतीत. यावर आज राज ठाकरे यांनी बोलताना पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

दरम्यान, आधी प्रत्येकाला स्वत:च्या जातीबद्दल अभिमान होता. पण अन्य जातींबद्दल द्वेष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला, असं मी एकटाच बोललो. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे, त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी पवारांना टोला हाणला.