खंडणी प्रकरणी: माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे यांचा अर्ज फेटाळला…


पुणे : औरंगाबाद येथील कारागृहात असलेल्या बऱ्हाटे याने ससून रुग्णालयामध्ये हृदयविकारासंदर्भात उपचार घेणे गरजेचे आहे. पुर्वी ऍन्जिओप्लास्टी झाली असून त्यावेळी दोन स्टेंट टाकण्यात आले होते. त्यानंतर, अजून दोन स्टेंट टाकायचे असल्याने औरंगाबाद कारागृहातून येरवडा कारागृहात ट्रान्सफर करण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात सादर केला होता. त्यास, विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी विरोध केला.
औरंगाबाद येथील घाटी हे शासकीय रुग्णालय असून, त्या ठिकाणी त्याच्यावर कोणत्या प्रकारचे उपचार केले जाऊ शकतात. त्यामुळे त्याला येरवडा कारागृहात ट्रान्सफर करण्याची गरज नाही. तसेच येरवडा कारागृहात ट्रान्सफर केल्यास त्यामार्फत कारागृहात षडयंत्र करण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तीवाद ऍड. चव्हाण यांनी केला. न्यायालयाने तो मान्य करत अर्ज फेटाळून लावला.
बऱ्हाटे याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, डॉक्टरांनी देखील प्रवास करण्यासाठी त्याला कोणत्याही अडचणी नसल्याचे सांगितले आहे. मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत न्यायालयीन असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याला येरवडा कारागृहात ट्रान्सफर करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
राजकीय आणि आर्थिक प्रभाव अधिक असल्याने तपासात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी बऱ्हाटे याला औरंगाबाद कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्याने येरवडा कारागृहात ट्रान्सफर करण्यासाठी केलेला अर्ज विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी फेटाळला.
नागरिकांची फसवणूक, खंडणी प्रकरणी रविंद्र बऱ्हाटेसह इतरांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यादरम्यान,त्यानंतरच बऱ्हाटे याला औरंगाबद येथील कारागृहात हलविण्यात आले आहे.